रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भातील आराखडा प्रलंबित असल्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारले होते. त्यावर लेखी उत्तर देत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कोकण ग्रामीण पर्यटन विकास समितीच्या आगामी बैठकीत पर्यटक सुरक्षा आराखड्याबाबत प्रस्ताव सादर केला जाईल तसेच या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास तात्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असून यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून ६५० लाईफ जॅकेट खरेदी करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून समुद्रकिनाऱ्यावर वॉच टॉवर्स देखील उभारण्यात आले असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्याचा सुमारे ७०० ते ८०० कोटींचा विकास आराखडा प्रलंबित असून आराखड्याच्या मंजूरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करून आराखडा लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू, असे आमदार निरंजन डावखरे म्हणाले
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.