Go Green Go Smart : कोकणात प्लास्टिक ची अनोखी भिशी
चिपळूण : महिलांसाठी भिशी म्हणजे पैसे साठविण्याचा एक प्रकार.बऱ्याच सोसायटी तील महिला ही महिन्याची भिशी करतात. दिवाळीसाठी, नवरात्रीसाठी,
बाहेर जाण्यासाठी , गणपतीसाठी वेगवेगळ्या सणांसाठी हा साठवणीतला पैसा वापरला जातो. मात्र हीच भिशी कोकणात अनोख्या पद्धतीने घेतली जात आहे. त्यात चक्क प्लास्टिक देऊन महिलांना पैसे कमावण्याची संधी मिळतआहे.
साहियाद्री निसर्गमित्र चिपळूण, डाऊ केमिकल इंटरनॅशनल, चिपळूण पालिका यांच्या सहकार्याने चिपळूण मध्ये प्लास्टिक भिशीचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये घरातील सर्व प्लास्टिक जसे कि लहान मुलांची खेळणी, मोडकी खुर्ची, प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग, इत्यादी कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक घेतले जाईल.
शहरातील ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी हि युक्ती आजमावली असल्याचे कळते. स्थानिक रहिवाशी सौ . राधिका पठारे (किरण विहार संकुल) यांनी आपले मत देताना असे सांगितले कि या योजनेमुळे घनकचरा वेगळा होऊन सहरातील प्लास्टिकच्या कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल आणि शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल.