Monsoonऔरंगाबाद (संभाजी नगर) - Aurangabadनाशिक

नाशिक मधील गोदावरीच्या पुराने औरंगाबादकर सुखावणार

नाशिकमध्ये सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुर आला आहे. या पुरामुळे नाशिककरांचे हाल झाले असले तरी मात्र औरंगाबादकर या पुरामुळे सुखावले आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने नगर जिल्ह्यातील कोपरगाव ओलांडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला त्यामुळे जवळपास जायकवाडी धरणापर्यंत गोदावरीचे पाणी पोहचलं आहे. जायकवाडी धरण औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह जवळपास ३०० खेड्यांची तहान भागवतं. त्यामुळे गोदावरीला आलेला पूर औरंगाबादकरांना सुखावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button