Monsoon

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस, जलाशयांमध्ये 58% भर

शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा | मराठवाड्याला ही दिलासा.

यावर्षी मान्सूनला तसा उशीरच झाला, पण त्यानंतरच्या सातत्याने पडत असलेल्या पावसाने तलावातील पाणी साठ्याची तूट भरून काढली आणि परिणामी जलाशय भरून गेले. राज्यातील प्रमुख जलाशयांमध्ये यंदा 58% पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीही यावेळी 58% साठा उपब्लध होता.

मुंबई शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी धरणे आता जवळजवळ भरली आहेत. तानसा जलाशयात १००% पाणीसाठा झाला आहे, बारवी धरणातही १००% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. बारवी धरण 100% भरले त्यामुळे दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त पाणी सोडावे लागले. त्याशिवाय मोडक सागर आणि मध्यम वैतरणा येथे 99% आणि 86% पाणीसाठा झाला असून मागील वर्षी तो 97% आणि 96% साठा होता.

महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील धरणे जलदगतीने भरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button