मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणकऱ्यांना वेगळीच चिंता लागली आहे. कोकणातील शिमगा आणि गणेश उत्सव म्हणजे कोकणकऱ्यांची हळवी बाजू. नोकरीधंद्यासाठी गावापासून लांब असून ही कोकणवासी शिमगा आणि गणेश उत्सवाला मात्र वेळात वेळ काढून जातात. ह्या वर्षी २८ मार्चला होळी तर २९ मार्चला धुलीवंदन आहे. अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेला शिमगा साजरा होणार कि नाही? कोरोनाची भीती लक्षात घेऊन ह्या वर्षी शिमगा कसा साजरा करायचा? असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख राजू कांबळी ह्यांनी केला आहे.
दर वर्षी कोकणात ३०० – ४०० बसेस हमखास जातात व बस चे भाडे ५० हजारां पर्यंत जाते. प्रवासी उत्सवाच्या १ महिना आधीच रेल्वे, एस. टी.बस, खासगी गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात करतात. मुंबई कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. लॉकडाऊन च्या चर्चेमुळे खासगी गाड्यांचे आरक्षण रद्द होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारनी अजून ह्या बाबत कोणतीही मार्गदर्शक मुद्दे प्रस्तुत करण्या आधीच हि स्थिती आहे असे बस मालक संघटनेचे हर्ष कोटक ह्यांनी सांगितले. असे असता ह्या बाबत बस संघटनेकढून प्रशासनाकाढे लवकरात लवकर निर्णय घेन्याची मागणी करण्यात आली.
मुंबई – पुण्यातच नव्हे तर खेड – रत्नागिरी व इतर कोकण परिसरात सुद्धा नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना आरक्षण करायचे की नाही? की इथूनच नमस्कार करायचा? हा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. परिस्तिथी ही लक्षात घेऊन १९ मार्च पासून सुरु होणाऱ्या शिम्गोतास्वासाठी शासकीय व प्रशासकीय नियमावली तयार करून सूचना द्यावी असे कोकण रेल्वे आणि एस. टी महामंडळाने मागणी केली आहे आणि लवकरात लवकर ह्यावर निर्णय व्हावा अशी आशा व्यक्त केली आहे.