CongressMaharashtra Govराजकारण

भाजपने देशातील सामाजिक एकतेला नख लावले – ना. बाळासाहेब थोरात

भाजप सरकारची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने काम करत आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम करणा-या भाजप सरकारने सामाजिक सौहार्दतेला नख लावून देश पेटवला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी आज नागपूर येथे वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, शेखर शेंडे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरूण रस्त्यावर उतरले आहेत. देशात धार्मिक विद्वेष पसरवून मतांचे राजकारण करण्याचा भाजपचा डाव जनतेने ओळखला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.

तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या असंघटीत कामगार सेलच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button