LokSabha
लोकसभेचे कामकाज मध्यरात्रीपर्यंत सुरु
लोकसभेमध्ये गोंधळ करून कामकाज ठप्प पाडण्याचा इतिहास असणाऱ्या लोकसभेने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत कामकाज करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे कामकाज चक्क ११ तास चालले असून जेवणाची सुट्टी न घेता सातत्याने चर्चा सुरु ठेवण्यात आली. गेल्या अनेक वर्षांनंतर हा दिवस असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी म्हंटले. या चर्चेमध्ये विरोधकांनी रेल्वेच्या खाजगीकरणाला विरोध केला. तर सत्ताधारी खासदारांनी रेल्वेच्या विकासाबाबत चर्चा केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी १०० खासदारांना मत मांडण्याची संधी दिली त्यात नवनिर्वाचित खासदारांना प्रामुख्याने संधी देण्यात आल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले.