पुणे
वारीत स्वच्छतेचा आणि आरोग्यतेचा प्रश्न निर्माण होणार नाही – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे करण्यात आला. त्या नंतर पत्रकार परिषदेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी श्री क्षेत्र देहू, आळंदी ते पंढरपूरपर्यंत वारीच्या मार्गावर ३० हजार शौचालय ताब्यात घेतल्याचे सांगितले. तसेच निर्मल वारी अभियानातून १६०० फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले. ‘ यासर्व सोयीसुविधेमुळे स्वच्छता, आरोग्याचा कोणताही प्रश्न पालखीत निर्माण होणार नाही. तसेच संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान ३०० किर्तनकारांच्या माध्यमातून स्चछतेसाठी जनजागृती करण्यात येत आहे’, अशी माहिती लोणीकर यांनी दिली.

