उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विकास प्रकल्पांचे उद्घाटन, नियोजित विकासावर भर देणे हा उद्देश अशी घोषणा!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी कलानगर जंक्शनच्या सी लिंक, स्मार्ट पार्किंग आणि बीकेसी येथील सायकल ट्रॅक तसेच वरळी उन्नत कॉरिडोरच्या भुयारीकरणासह अनेक पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन झाले. पर्यावरणाचे रक्षण करताना मुंबईचा विकास नियोजित पद्धतीने केला जाईल, असे ठाकरे म्हणाले.
“आता नियोजित पद्धतीने मुंबईच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. दिवसेंदिवस मुंबईतील वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे आणि स्मार्ट पद्धतीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करताना ते सर्वांना कसे परवडेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. सर्व विकास कामे राबवताना आम्ही पर्यावरणाचे रक्षण देखील करीत आहोत”, असेही ते पुढे म्हणाले.
“असे नाही की आम्ही केवळ उच्चभ्रूंसाठी काम करत आहोत. आज मी सायकल ट्रॅकच्या उद्घाटनाचा मला खूप अभिमान वाटतो. जेव्हा आपण सायकलचा विचार करता, तेव्हा तुम्ही दिवसभर मेहनत घेणार्या मुंबईच्या डब्बावाल्यांचा विचार करता.” यावरून दिसून येते की उद्धव ठाकरे यांना सामान्य जनतेची किती काळजी आहे. त्यांनी हा प्रकल्प सर्व गरजू आणि सामान्य जनतेसाठी काढला आहे हे दिसून येते.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, दाट लोकवस्ती असलेल्या भागात प्रकल्प हाती घेताना लोकांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित केले जाईल. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, एलबीएस मार्ग, डब्ल्यूईएच आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यासारख्या शहरातील मुख्य रस्त्यांचे नूतनीकरण सरकार करेल. असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले. “मुख्य उद्दीष्ट पदपथ सुधारणे आहे. खरं तर, पुढील पाच वर्षांत शहरातील सर्व पदपथ आणि पादचारी मार्ग सुधारण्यात येतील. बीकेसी प्रमाणेच आमच्याकडे डब्ल्यूईएच बरोबरच सायकल ट्रॅकदेखील असतील,” ते म्हणाले.