शेतकरी आंदोलनामुळे होतेय व्यापार्यांचे नुकसान! कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांचा दावा
मुंबई: दिल्लीत शेतकरी कायद्या विरोधातील आंदोलनाला आता ७० पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत.यामुळे भारतातील इतर उद्योगांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दिल्लीतील सुरु असलेल्या आंदोलनामुळे देशातील व्यापार उद्योगाला सुमारे एक लाख कोटींचा फटका बसला आहे. दिल्लीत ३० हजार कोटींचा माल थांबला असून तर राज्यातून येणारा ७० हजार रुपये किंमतीचा मालही अडकला आहे. अशी माहिती कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.
त्यांनी सांगताना असे मत दिले की, हा कायदा जसा शेतकऱ्यांचे हित साधणारा आहे तसाच तो व्यापार्यांसाठी ही फायदेशीर आहे. पण या आंदोलनामुळे देशातील व्यापार्यांना आतापर्यंत १लाख कोटींचे नुकसान झेलावे लागले आहे आणि जर का हे आंदोलन असेच चालू राहिले तर आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पुढे ते असेही बोलतात की, शेतकर्यांना सर्व प्रकारचे अनुदान मिळते, त्यांना कर्ज माफीही मिळते, तसेच केंद्र सरकारकडून लहान मोठ्या उद्योजकांना वेळोवेळी मोठी मदत केली जाते पण व्यापार्यांना मात्र काहीच मदत किंवा अनुदान सरकारकडून मिळत नाही. सध्या ऑनलाईन व्यापार्यांसोबत देशातील व्यापारी हे लढत आहेत. या संदर्भातही एक समिती स्थापन करणार असल्याचे खंडेलवाल सांगतात.
