Maharashtra GovPoliticsराजकारण

देवेंद्र फडणवीस यांनी केली पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची घोषणा !

भाईन्दर: विधानसभेचे अध्यक्षपद हे नुकताच रिकामे झाल्याने आता या वर कोण येणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची आशा दाखवली आहे. भाईन्दरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्तांतराबाबत खूप मोठे विधान केले.

मीरा- भाईन्दर मध्ये शुक्रवारी वेगवेगळे कार्यक्रम झाले. मीरा भाईन्दरच्या अग्निशमन दलात टर्न टेबल लॅडर दाखल झाला त्यामुळे त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले होते. त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही सत्तांतराबाबत नकळत उद्गार काढले .

ते बोलले कि भाजप पेक्षा कॉंग्रेस हा कमी आमदार असलेला पक्ष आहे आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागत आहे हि खंत आहे. हि एका प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. यांनी याचे फासे आम्ही निश्चित बदलु तसेच हे फासे खूप मोठे असतील असे संकेतही माजी मुख्यमंत्री यांनी दिले. तसेच असे बोलून ऑपरेशन लोटस परत होण्याची शक्यता वर्तवली.

तसेच नाना पटोले यांना अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि कॉंग्रेसने कोणाला अध्यक्ष कारणाव आणि करू नये यासठी पक्षच कुठे उरला आहे अस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button