सोशल मीडिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोणार सरोवराला भेट !

बुलढाणा: शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते बुलढाणा दौऱ्याला असताना लोणार सरोवराला भेट दिली. ते राजकारणात उतरण्याआधी एक छायाचित्रकार होते त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनातील छाया चित्रकार जागा झाला व त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये लोणार सरोवराची काही छायाचित्रे काढलीत. या दौऱ्याला त्यांनी लोणारची पाहणी सुद्धा केली.

शुक्रवारी सकाळी साधारणतः ९:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराच्या व्ह्यू पॉईंट वरून सुरुवात केली. त्यांच्या सोबत बुलढाण्याचे पालक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी हे उपस्थित होते. काही अधिकारी हे लोणार सरोवराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देत होते. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढून काही छायाचित्रे टिपली.

मागच्या कांही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोणार सरोवाराच्या पर्यटन वाढीबाबत मुख्यमंत्री हे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आणि यासाठी कायकाय उपयोजना करता येईल याची हि चर्चा होणार आहे. या दौऱ्यानंतर ते औरंगाबाद येथे प्रस्थान करणार आहेत कारण शहराचे नाव बद्द्ल्याने तेथे परिस्थिती तापलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button