Ratnagiriराजकारण

तिवरे दुर्घटना संदर्भात शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे २३ जण वाहून गेले, मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. तिवरे परिसरातील अनेक गावांना या धरण फुटीचा मोठा फटका बसला. त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी खूप कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना जास्तीची आणि तातडीची मदत करणे गरजेचे आहे. येथे पाऊस पडूनही पाणी प्रश्न निर्माण झाला. सध्या येथे टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. अनेकांना घरे नसल्याने त्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकांचे शिक्षण खोळंबले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष देऊन येथील ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवाव्यात, अशी मागणी पत्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

पवारांनी या पात्रातून तिवरे दुर्घटनेची तुलना माळीण दुर्घटने बरोबर करत या घटनेच्या वेळी ज्याप्रमाणे तातडीने मदत केली गेली तशीच काहीशी मदत तिवरे धरणाजवळील गावकऱ्यांना देखील करावी अशी मागणी देखील केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button