यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेश १५ जुलैपर्यंत
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकारच्या युजीसी मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची मुदत १५ जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर प्रवेश घेतल्यास विलंब शुल्क आकारले जाईल. विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षा, पत्रकारीता पदवी व पदविका, बीए, लायब्ररी सायन्स, एम ए, बीएस सी, एमबीए, एमएससी तसेच आरोग्य विज्ञान शाखा, शिक्षणशास्त्र शाखा, संगणक शास्त्र, विविध व्यवसायपयोगी उपयुक्त अभ्यासक्रम अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac , www.ycmou.ac.in वर नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश हेल्पलाईन देखील विदयापीठातर्फे सुरू करण्यात आली असून त्यासाठी ०२५३-२२३०५८०, २२३१७९५ वर संपर्क साधता येईल.