ठाणे (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर भागामध्ये ओढवलेल्या भीषण पूरस्थितीमध्ये आपला संसार गमावलेल्या आया-बहिणींना संसार उभा करण्यासाठी हातभार लावणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता संघर्ष संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने या पूरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी लागणारे साहित्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दोन ट्रक भरुन पाठवले. या ट्रक्सना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, समाजसेविका ॠताताई आव्हाड प्रदेश चिटणीस सुहास देसाई,यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील आठवड्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने लागणार्या जीवनावश्यक वस्तू पाठवल्या होत्या. मात्र, या पूरग्रस्तांचे संसार वाहून गेल्यामुळे त्यांचा संसार उभे करण्याचे मोठे आव्हान होते. हे ध्यानात आल्यामुळे आ. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परांजपे यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी त्यांना आवश्यक असणार्या गृहपयोगी वस्तू जमा केल्या. तेथील महिलांना माहेरची माया देणे गरजेचे असल्यानेच भांडी, गृहपयोगी वस्तू पूरग्रस्त भागामध्ये पाठवल्या. या ट्रक्सला खा. सुप्रिया सुळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. हे साहित्य घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगली आणि कोल्हापुरात दाखल होणार असून ते प्रत्येक कुटुंबाला हे साहित्य पुरविणार आहेत.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी, आ. आव्हाड आणि ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतूक केले. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवलेली ही दातृत्वाची भावना कौतुकास्पद आहे. मायभगिनींचे संसार उभे करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत महत्वाची असून माणुसकी जीवंत असल्याचे आ. आव्हाड, परांजपे आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील. नगरसेविका राधाबाई जाधवर, अंकिता शिंदे, अपर्णा साळवी, प्रमिला केणी, आरती गायकवाड, वर्षा मोरे, अनिता किणे, सुनिता सातपुते, रुपाली गोटे, हफिजा नाईक, आशरीन राऊत, सुलोचना पाटील, मा. नगरसेविका मनाली पाटील, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संगिता पालेकर, नगरसेवक राजन किणे, प्रकाश बर्डे, मुकुंद केणी, मोरेश्वर किणे, बाबाजी पाटील, सिराज डोंगरे, महिला पदाधिकारी रचना वैद्य, सादिया मेमन, मेहरबानो पटेल, ज्योती निंबरगी, शशिकला पुजारी, स्मिता पारकर, कांता गजमल, अनिता मोटे, माधुरी सोनार, पुनम वालिया, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, अपर्णा पाटील, अक्का नाडार, शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, शमीम खान, विजय भामरे, कार्याध्यक्ष महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र पालव, निलेश कदम, समीर पेंढारे, निलेश फडतरे, दत्तात्रय जाधव, अजय सकपाळ, जावेद शेख, बबलू शेमना, रत्नेश दुबे, शहर कार्यकारिणी सदस्य हेमंत वाणी, अजित सावंत, सिल्वेस्टर डिसोझा, तुळशीराम म्हात्रे, शिवा कालुसिंह, तुकाराम गायकवाड, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील, विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष संकेत नारणे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, ओबीसी सेल अध्यक्ष राज राजापूरकर, हॉकर्स सेल अध्यक्ष सचिन पंधारे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष राजू चापले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, ज्येष्ठ नागरीक सेल अध्यक्ष रामदास खोसे, व्यापारी सेल अध्यक्ष दिपक क्षत्रिय तसेच वॉर्ड अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.