कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्त भागांना रिपाइं ची भरीव मदत
मुंबई दि. 22 – केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्तांच्या मदतीला रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या आहेत. सांगली आणि कोल्हापुरात महाजलप्रलयाने जनजीवन उध्वस्त झाले असून या भागातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ब्रम्हनाळ शाळेतिल (हायस्कुल) ५ वि ते १० विच्या विध्यार्थ्यांना १ वर्षाकारीता दत्तक घेण्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या महाराष्ट्र उपाध्यक्षा संघमित्राताई गायकवाड यांनी नुकतीच केली.
त्यांनंतर सांगलीतील ५ गावांतील विध्यार्थी ब्रम्हनाळ (हायस्कुल) शाळेत शिकत आहेत. वसगडेगावं, खटाव, ब्रह्मनाळ, पलूस या गावांतील पूरग्रस्त भागाचा व गरजू महिलांना साड्या व जीवनश्याक वस्तू साखर, तांदूळ, कोलगेट, मिनरल वाटर, साबण, गहू, मेडिसन, इत्यादी सामग्री स्वतः खरेदी करून पूरग्रस्त भागाची पाहणी करून पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संघमित्राताईनी केला. या प्रसंगी माजी आमदार एल टी सावंत, एमगरसर, पोलिसपाटील जेन, कुमार सावंत,अनिल सावंत, राजू सावंत,आदी उपस्थित होते.