मनोरंजन

मुळशी पॅटर्नच्या रिमेकचे नाव पुन्हा बदलले

रवीण तरडे निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ने  बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला गोळा केला होता. हा अॅक्शनपॅक्ड मराठी चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यामुळेच सलमान खानने याच्या रिमेकचे राईट्स घेतले आणि भावजी आयुष शर्माला नायक बनवून चित्रपट निर्मितीची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरवर सोपवून चित्रपटाचे नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ ठेवण्यात आले होते. स्वतः सलमान खानही या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

लॉकडाऊनमुळे शूटिंग होऊ शकले नाही. मात्र आता लॉकडाऊन उठल्यानंतर सलमानने सर्वप्रथम त्याच्या राधे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि आता तो या चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार आहे. तसेच या चित्रपटाचे नावही आता ‘अंतिम’ असे ठेवण्यात आलेले आहे. 15 नोव्हेंबरपासून ‘अंतिम’चे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. आयुष या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारीत आहे. हा चित्रपट आयुषच्या करिअरला एक वेगळे वळण देईल असा विश्वास सलमान खानला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button