नितेश राणे यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधून त्यांच्या वर चिखलाचे पाणी ओतले. या प्रकरणी नितेश राणेंवर कारवाई करण्यात आली व पोलिसांनी त्यांना अटक देखील केले. आज राणेंना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कणकवली बाजारपेठ बंद केली.
तत्पूर्वी नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांनी पोलिसांशी बोलताना गोंधळ घातला होता. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही मला अटक केली तर कणकवलीकर मरतील, असे म्हणत राणेंनी पोलिसांना अटक न करण्याचे आवाहन केले. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला.