Maharashtra Gov

राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी घेतला आदिवासी विकास विभागाचा आढावा

राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाची संख्या सध्या आठ असून अजून पाच कार्यालये निर्माण करण्यासाठी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करावा असे आदेश देखील राज्यमंत्री यांनी दिले. या आढाव्या दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा देखील उपस्थित होत्या.

एकलव्य शाळांच्या संख्येत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा विषयात प्रोत्साहित करण्यासाठी 10 ते 20 खेळांची यादी तयार करुन त्याबाबतचे धोरण तयार करण्यात यावे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण करणे, याच संस्थेमध्ये अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे, पुणे येथे अनुसूचित जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा संकुल तयार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना डॉ. फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button