AgriculturalFarmers

शेतकरी आंदोलन अधिक त्रीव्र ! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंत्र्यांशी तातडीने भेट!

नवी दिल्ली: कृषीकायदे जाहीर केल्यापासून शेतकरी बांधवांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे.या आंदोलनाला आज साधारतः ७० दिवस पूर्ण होतील.शेतकरी हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत तर सरकारही पाठी व्हायला तयार नाही खरेतर हे कायदे शेतकर्यांना हा हक्क देतात की ते आपली उत्पादने ही मोठ्या खाजगी व्यापार्यांना विकू शकतात तसेच ते देशात कुठेही असे विकू शकतात त्यांना दरवेळी दलालांच्या हाताखाली राहायला नको.

दलालांचा एकाधिकार कमी करण्यासाठी ही पाउले सरकारने उचलली आहेत. शेतकर्यांना त्याचा मोबदला हा 3 दिवसात लगेच मिळेल अशी ग्वाही देखील हा कायदा देतो. कृषी मंत्री नरेंद्र सिंघ तोमर असेही म्हणतात की हा कायदा देशांतर्गत व्यवसाय वाढवेल. पण शेतकर्यांना ही गोष्ट मान्य नाही. व त्यांना मंडीचाच कायदा पाहिजे आहे.

प्रधान मंत्री नंरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाबाबत अनेक मंत्रायांसोबत तातडीने बैठक घेतली आहे.आणि शेतकरी सुद्द्धा तेवढ्याच त्रीव्रतेने आंदोलन करण्यात गुंतले आहे.

संध्या गाझीपुर च्या भागात पोलिसांनी कलम १४४ लागू केला आहे. ग्रेटा थनबर्ग यांनी सुद्धा शेतकरी आंदोलांवर आपले मत ट्विटरवर मांडले. दिलीप मंडल जे द प्रिंटचे लेखक आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाबाबत आपले मत जाहीर करताना असे सांगितले की या आंदोलनामुळे काही गोष्टी सध्या झाल्या आहेत त्यां म्हणजे शेतकऱ्यांचे एकत्रीकरण झाले आहे.

दिल्ली सोबत मुंबईतही याचा विरोध चालू आहे.जवळपास २१ जिल्ह्यातून हजारो शेतकरी हे मुंबईत आले आहेत.महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.मुंबई मधील आझाद मैदानात जमायला सुरुवात केली . सुमारे १५ हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button