Maharashtra Govऔरंगाबाद (Auragabad)

आताचा लॉकडाऊन शेवटचा ठरावा – देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा

औरंगाबाद : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शाश्वत पर्याय होऊ शकत नाही. औरंगाबादमध्ये १० जलै पासून होणारा लॉकडाऊन अखेरचा ठरावा त्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. याकाळात युद्धपातळीवर तपासण्या करणे हाच कोरोनावर प्रभावी उपाय असू शकतो. असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सरकार पाडण्याची हूल उठवली जाते. घटक पक्षांमधील कुरघोडीचे राजकारण व कुरघोडीचे राजकारण व अंतर्विरोधामुळेच हे सरकार पडेल, असेही ते म्हणाले.

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती. घाटीतील काेराेनाबाबतची माहिती घेतल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी व पीपीई किट बाहेरून आणायला लावले जाते. औरंगाबादेत स्वॅब टेस्टिंगमध्ये १२ ते १४ तासांत रिपोर्ट येतो. इतर शहरांत मात्र तीन दिवस लागतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजप समांतर सरकार चालवत असल्याच्या आराेपाचे खंडन करताना फडणवीस म्हणाले, मी व प्रवीण दरेकर राज्यभर फिरत असताना स्वत: (मुख्यमंत्री) घरात बसून राहणारेही आमच्यावर आक्षेप घेत आहेत. कुणी काहीही म्हटले तरी आम्ही फिरणारच.

घाटीतील सुपरस्पेशालिटीतील पदभरती, नियमित पदभरती रुग्णसेवेसाठी आवश्यक : आहे. कोरोना महामारीमध्ये कर्मचारी गरजेचे आहेत. मुंबईत डॉक्टर्ससाठी ३ लाख पगार, तर औरंगाबादेत सव्वा लाख पगार सरकारने निश्चित केल्याने कर्मचारी मिळत नाहीत, अशी टीका विराेधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. आपण स्वत: मुख्यमंत्री असताना औरंगाबादेतील ज्या पदभरतीच्या मागण्या पूर्ण हाेऊ शकल्या नाहीत त्यासाठी आता फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करताना दिसले.

वाढत्या काेराेना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गुरुवारी औरंगाबादचा दाैरा केला. घाटी रुग्णालयास भेट देऊन त्यांनी उपाययाेजनेचा आढावा घेतला. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, माजी मंत्री गिरीश महाजन. आमदार अतुल सावे यांनीही घाटीसमोरील समस्यांचा पाढा वाचला. यासोबतच ही कामे मार्गी लावण्यासाठी मागील काळात बराच प्रयत्न केल्याचेही लक्षात आणून दिले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते.

नॉन कोविड रुग्णांची काय सोय ? : कोरोना रुग्णांचे ठीक आहे, पण नॉन कोविड रुग्णांसाठी काय व्यवस्था आहे, त्यांना उपचार दिले जात आहेत का? याची फडणवीसांनी चौकशी केली. या वेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दररोज १ हजार स्वॅब तपासणी हाेत असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button