Monsoonमुंबई

मुंबईत पावसाचे ३ बळी

मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. पावसामुळे शॉक लागल्याने तीन जण मृत्युमुखी पडले आहेत, तर पाच ठिकाणी झाडे कोसळली असल्याची घटना समोर आली. पावसाची अशी स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. आज पहाटे ७.४८ च्या सुमारास अंधेरी पश्चिमेला आरटीओ ऑफिससमोर काशीमा युडियार वय वर्ष ६० या वृद्ध महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाला. तर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथे इरवानी इस्टेटजवळ शॉक लागून चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव (६०) आणि संजय यादव (२४) अशी मृतांची नावे आहेत. आशादेवी यादव ही पाच वर्षीय मुलगी आणि दीपू यादव (२४) या दोघांची प्रकृती स्थिर आहे. पुढील ४८ तास मुंबईत शहर आणि उपनगरात पावसाची संततधार कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button