लालबाग – महाराष्ट्रासह देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा गुरुवारी २० जून रोजी भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’ या गजरात पार पडला. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपुजन संकष्टी चथुर्तीच्या मुहूर्तावर केले गेले. राजाची मूर्ती बनविण्यास सुरुवात होईल. या सोहळ्याचे लाइव्ह दर्शन मंडळाच्या फेसबुक, युट्यूब पेज तसेच वेबसाइटवर करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाद्यपुजन सोहळ्याला भक्तांची मोठी गर्दी होती. लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटूंबीय घडवतात. दरवर्षी लालबागच्या राज्याच्या मूर्तीचे वेगळे रुप पहायला मिळते यंदाच्या वर्षी राजाचे रुप नेमकं कसं असणार याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे. या पाद्यपुजन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. दरवर्षी अनेक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात आता पाद्यपुजना नंतर मात्र भाविकांना बाप्पाच्या मुखदर्शनाची आस लागली आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.



