फूड शो (Food Show)
डिजिटल ठाणे वार्ता या वेब पोर्टलच्या माध्यमाने राजकारण, समाजकारण, मनोरंजन, लाईफस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हल आणि फूड अशा विविध क्षेत्रातील माहिती नागरिकांना वाचायला मिळत आहे. त्यासोबतच, व्हिडिओद्वारे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्ह्यांपैकी ठाणे हा एक लोकप्रिय जिल्हा आहे. ठाणे जिल्हा विविध कला संस्कृतींनी बहरलेला आहे. ठाणे जिल्ह्यात विकसित शहरे तर आहेतच, त्याचप्रमाणे विकास होऊ पाहणारा ग्रामीण भाग सुद्धा आहे. ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच पदार्थांना एक वेगळी विशिष्ट अशी चव प्राप्त झालेली असते. म्हणूनच, अशा या जिल्ह्यात स्पेशल पदार्थांना आणि खाण्याला एक वेगळं महत्त्व आहे.
जिल्ह्यातील विविध चवी, मसालेदार पदार्थ, चवदार चविष्ट, रंगदार मेजवानीचा अनुभव खव्वयेगिरींना घेता यावा, यासाठी आणि खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीने कोण-कोणत्या ठिकाणी कोणते रुचकर पदार्थ मिळतील? त्यांचे वैशिष्ट्य काय आहे? त्यांची किंमत? यासारखी बरीच माहिती खाद्यप्रेमींना देण्यासाठी डिजिटल ठाणे वार्ता एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहे.
ठाणेकरांना आणि संपूर्ण जिल्ह्यातील खाद्य प्रेमींना खाद्याची सफर घडवून आणण्यासाठी डिजिटल ठाणे वार्ता digitalmaharashtravarta.com लवकरच घेऊन येत आहे… एक नवीन फूड शो…Good Food is Good Mood…लवकरच….