
सोशल मीडियावर सीएसएमटी-कर्जत लोकल 15 डब्यांसह धावणार असल्याचा कथित शासकीय निर्णय (GR) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, हा जीआर पूर्णपणे बनावट असून दिशाभूल करणारा असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मध्य रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
व्हायरल जीआरबाबत मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये सीएसएमटी-कर्जत लोकल 15 डब्यांसह धावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही स्थानकांवर चढ-उतारासंबंधीही सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा कथित शासकीय निर्णय अधिकृत नसून बनावट असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (Chief PRO) यांनी सांगितले की, हा दस्तऐवज जाणीवपूर्वक तयार करून चुकीची माहिती पसरवली जात आहे. हा बनावट जीआर कोणी तयार केला किंवा प्रसारित केला याची माहिती मिळाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
A fabricated notice, designed to resemble an official Government Resolution (GR), claims that #Mumbai local train passengers travelling on the new 15-car train would be prohibited from getting down at Diva, Dombivli and Kalyan, warning of police action against violators. Central… pic.twitter.com/lkKvoP4d2O— Rajendra B. Aklekar (@rajtoday) July 18, 2026
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन
प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही संदेशावर किंवा दस्तऐवजावर आंधळा विश्वास ठेवू नये. रेल्वेसंबंधीची माहिती केवळ मध्य रेल्वे किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत माध्यमांतूनच तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अफवांपासून सावध राहा
सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आणि अफवा पसरवू न देण्याचे आवाहन केले आहे.



