तंत्रज्ञान
तांत्रिक अडचणीमुळे ‘चंद्रयान – २’ चे प्रक्षेपण रद्द
आज होणारे ‘चंद्रयान – २’ चे प्रक्षेपण तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आज १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून जिएसएलव्ही मार्क – ३ च्या मदतीने चंद्रयान – २ अवकाशात झेपवणार होते. भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चंद्रयान – २’ या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता.
चंद्राच्या उदरात प्रचंड प्रमाणात ऊर्जा सामावलेली आहे. ही ऊर्जा पृथ्वीवर आणता आली तर मोठेच घबाड हाती लागणार आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम कमीतकमी खर्चाची असून या मोहिमेद्वारे करण्यात येणारे संशोधन हे केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे.