गृहनिर्माण संस्था त्यांच्या जागेत उभारत आहेत कोरोना उपचार सुविधा
मुंबई : गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या क्लबमध्ये कोरोनाच्या उपचाराच्या सोई असलेले केंद्र उभारावे, असे आवाहन खा. गोपाल शेट्टी यांनी केले आहे.
ते म्हणालेत की ऑक्सिजनचे संच लावणे फार महाग नाही. रुग्णालयात आपण ऑक्सिजनची जो खर्च करतो त्यापेक्षा हा खर्च कमी आहे. यासाठी खर्च भागवण्यासाठी काही शुल्क आकारता येईल. पण यामुळे रुग्णांचा उपचार घरी किंवा घराजवळच्या परिसरात होईल. रुग्णांना घरचे जेवण, घरचे वातावरण मिळेल. याचाही आजार दुरुस्त होण्यात मोठा फायदा होतो.
शेवरी येथील एका उच्च्भ्रू गृहनिर्माण संस्थेने ऑक्सिजनचा पुरवठा करणारे दोन संच विकत घेतले आहेत. यातून १७० फ्लॅट्सची गरज भागेल हे संच बसवल्यानंतर ते आणखी दोन संच बसवणार आहेत. याशिवाय विलगीकरणासाठीही काही खाटा तयार करण्याचा त्यांचा विचार आहे.
गृहनिर्माण संस्थांची संगठना बांधणारे रमेश प्रभू म्हणाले की, याबाबत सरकारचे काही निर्देश नाहीत. गृहनिर्माण संस्था स्वतः हे करत आहेत.

