Maharashtra Govमुंबई
मराठी बातम्या सलग 11 व्या दिवशी पेट्रोल – डिझेल दरात वाढ
मुंबई : सलग अकराव्या दिवशी आज बुधवारी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची व डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७७.२८ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.७९ रूपये प्रति लिटर झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८४.१५ रूपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.३२ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.८६ रूपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७३.६९ रूपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७९.०८ रूपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७१.३८ रूपये प्रति लिटर झाले आहेत.

