FeaturedMaharashtra Govमुंबई

किंवा काँग्रेसच्या खाटेची “कुरकुर” मनातल्या-मनातच थंडावली ही असेल? -आशिष शेलार

मुंबई : महाजॉब्स पोर्टलवरुन महाविकास आघाडीत घडलेल्या महाभारतावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेना दोन्ही पक्षावर मिश्किल टीका केली आहे. महाजॉब्सची जाहिरात प्रोटोकॉल नुसारच, असे उद्योग मंत्री सामनामध्ये म्हणतात,तर मा. बाळासाहेब थोरात दै.सकाळमध्ये म्हणतात की,शिवसेनेने “दिलगिरी” व्यक्त केली.खरे काय ते देव जाणो?. मनातल्या-मनात दोन्ही पक्षात घडले ही असेल?किंवा काँग्रेसच्या खाटेची “कुरकुर” मनातल्या-मनातच थंडावली ही असेल? अशी टीका शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. मात्रप्रसारमाध्यमांना जाहिरातीत प्रोटोकॉलनुसारच नेत्यांचे फोटो छापण्यात आल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केल्याने शेलार यांनी टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button