Maharashtra GovPoliticsमुंबई

‘कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…’ प्रवीण दरेकर यांचा पवारांना टोला

मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या विधानावरून रंगलेला वाद अद्याप शमलेला नाही. त्यातच ईदला कुर्बानी देण्यावरून राज्यात चर्चा सुरू आहे. त्यासाठी शरद पवार यांनी बैठक बोलावली. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे.

मुस्लिम समाजाचा बकरी ईद सणाला कुर्बानी देण्यासंदर्भात शरद पवार यांनी बैठक घेतली. त्यावर “कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…” असा टोला दरेकर यांनी  लगावला आहे.

“राम मंदिर बांधून कोरोना जाणार का? असं विचारणारे श. प. कुर्बानीसाठी बैठक घेतात, मुख्यमंत्र्यांना मार्ग काढण्यास सूचना करतात… कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…” असे ट्विट करत दरेकरांनी पवारांना टोला हाणला आहे.

“राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त कोरोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.” असं सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button