Maharashtra GovPoliticsबृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

… तर सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!;आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत . महापौरांनी कोव्हिड सेंटरमधील कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिला असल्याचा आरोप मनसेने केला आहे . यानंतर आता, भाजपा नेते व आमदार. आशिष शेलार यांनी देखील शिवसेनेसह मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट…शिवसेनेच्या नगरसेवकांना 535.95 कोटींचा निधी…वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची ‘प्रिपेड’ समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!” असा घणाघात शेलार यांनी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button