BJPCongressPoliticsShivSenaमुंबईराजकारणसोशल मीडिया

बात ‘हरामखोरीची’ निघाली तर दूर तलक जायेगी, शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना असे द्वंद्वयुद्ध सुरू आहे. त्यातच कंगनाच्या पाठीशी भाजप  ठामपमे ऊभी असल्याने शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील असं शिवसेनेने भाजपाला अप्रत्यक्षरित्या म्हटलं होतं. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला जोकरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा असे ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

एकापाठोपाठ एक ट्विट करत शेलार यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या  घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असा प्रश्नही शेलार यांनी सेनेला केला आहे.

भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असा प्रश्नही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे.

त्याचसोबत कर्तबगार मुंबई पोलिसांवर मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button