Politicsमुंबईराजकारण

कंगना रणौत राजभवनावर ; राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे .कंगना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली, तर ४ वाजण्याच्या सुमारास ती राजभवनात पोहचली. यावेळी तिची बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती.

कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीवरून राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली की, मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल त्यांना मी सांगितले. मला आशा आहे मला न्याय नक्की मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा बसेल. राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button