Politics

नाना पटोले यांचा विधानसभेच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा, शरद पवारांचे हे उदगार

मुंबई: विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सुपूर्त केला आहे. येणाऱ्या निवडणुकांमुळे सध्या महाराष्ट्र बर्याच घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीत पक्ष बद्ल घडून आलेत. तसेच खुद्द नाना पटोले यांनी विधान सभेत मतपत्रीकानी घ्या अशी मागणी केली होती. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याचे समजते.

या बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतरच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तातडीने नाशिक हून मुंबईला आले. नाना पटोले यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांना बोलावले असे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी यावर आपला मत व्यक्त केला.

त्यावेळी ते असे म्हणाले, ” विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होता आता ते रिकामी झालेले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याची पुन्हा चर्चा होणार ” जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधान सभा चे अध्यक्ष कोण होणार या बाबत विचारताना कॉंग्रेसमधील संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर, आणि आमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला ह्यात सहभागी नाही केले यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button