महाबळेश्वरमध्ये बहरला कश्मिरी केशर !
केशरच्या कंदाना फुले आल्यामुळे हा प्रयोग यशस्वी:
कृषी विभागाव्हा दावा
सातारा: महाराष्ट्रातील मिनी काश्मिर आणि स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असेल्या महाबळेश्वरमध्ये केशरची लागवड यशस्वी झाली आहे. महाबळेश्वर, पाचगणीत काही महिन्यांपूर्वी केशरची लागवड करण्यात आली होती. त्या केशरची कंद आता फुलांनी बहरले आहेत. काश्मिरच्या किश्तवाड येथून आणलेली केशरची कंदे महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर आणि मेटगुताड येथे प्रायोगिक तत्वावर लावण्यात आली होती. महाबळेश्वरचे वातावरण केशर लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे केशरची लागवड करण्यात आली होती.
महाबळेश्वर भागात केशर लागवड करण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता या भागात आणखीन काही शेतकऱ्यांकडून ही केशर लागवड करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे आता महाबळेश्वरची ओळख आता स्ट्रॉबेरी उत्पादनाबरोबर केशर उत्पादनाचा भाग म्हणून होण्याची शक्यताआहे.
भारतात केवळ काश्मिरमध्ये केशरचे उत्पादन घेतले जाते. ते ही श्रीनगर येथील पंपुर आणि किस्टवाड या गावांमध्येचे याचे मुख्यत: उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी जवळपास ४५० केशरचे कंद हे मागविण्यात आले होते. त्यानुसार महाबळेश्वर मधील तीन शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात याची लागवड आपल्या शेतात केली होती. कृषी विभागातर्फे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून करण्यात आले. त्यापैकी तीन कंद हे चांगले फुटले असुन त्याला केशर आले आहेत. आता ते वाळविण्याची प्रक्रिया सुरू असुन उर्वरित कंद देखिल लवकरच केशर फुटण्याच्या मार्गावर आहेत.
या प्रयोगावरून हे उत्पादन महाबळेश्वरसारख्या आपल्या भागात देखिल घेऊ शकते हे सिध्द झाले असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने आता आणखीन १० शेतकरयांतर्फे या केशरच्या कंदाची लागवड करण्यात येणार आहे. एखादा वेगळा व नाविन्यपुर्ण प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने ही केशर लागवड करण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये लागवड केलेल्या केशरच्या कंदाची योग्य पद्धतीने लागवड आणि जोपासना केल्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरताना दिसत आहे. देशात केशरची लागवड जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड आणि कोमपूर येथे मोठ्या प्रमाणात केली जाते. महाबळेश्वर कृषी विभागाने केशरची लागवड महाराष्ट्रात व्हावी म्हणून प्रयोगाकरिता ४५० कंद प्रति ५० रुपये दराने आणली होती.
महाबळेश्वरमधील श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे लागवड केलेल्या कंदाना फुले आली आहेत. त्यामुळे आता महाबळेश्वरातही केशर लागवड करु शकतो असा विश्वास असल्याचे कृषी सहायक दिपक बोर्डे यांनी सांगितले.