Health & Fitness

१ मार्च पासून कोरोना लसीकरणाच्या ३ऱ्या टप्प्यास सुरुवात!

मुंबई: कोरोना लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा हा आता जवळपास पूर्ण होत येत असतानाचा कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च पासून चालू होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या दररोज ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत ५ लाखांहून जास्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात आली आहे.

१ मार्चपासून सुरु होणार्या तिसऱ्या टप्प्यात वयवर्षे ५० आणि अधिक असलेल्या नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे कळते. १ मार्चपासून नोंदणीही चालू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे हे पुढे सांगताना असेही म्हणाले की केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने ६५२ केंद्रांवर लसीकरण सुरु केले आहे. लसीकरणाच्या संख्येत वाढही प्रत्येक आठवड्यात होत आहे.

वयवर्षे ५० आणि ज्यांना आधीच शारिरीक व्याधी आहेत अश्या नागरिकांचे ३र्या टप्प्यात लसीकरण होईल. पण अजून या संदर्भात केंद्र सरकारकडून काही सूचना मिळाल्या नाहीत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणामुळे अजूनतरी कुठेही गंभीर दुष्परिणाम झाले अश्या कुठल्याही घटनांची नोंद झाली नाही. आरोग्यमंत्री यांनी आवाहन केले आहे की, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर, आणि वारंवार हात धुणे या तीन सूत्रांचा अवलंब करावा व तो चालू ठेवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button