भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली (७२) वगळता इतर कोणताही खेळाडू चांगली खेळी करू शकला नाही. आता १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान भारत-इंग्लंड दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. या कसोटीआधीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की कोपर दुखापतीमुळे आर्चर भारताविरुद्धची दुसरा कसोटी सामना खेळणार नाही.
वास्तविक, कोपराच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला आता इंजेक्शन घ्यावं लागलं आहे, ज्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-० ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत आर्चरच्या अनुपस्थितीमुळे इंग्लिश संघाला दुसर्या कसोटीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी भारताला २२७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. आर्चर संघाबाहेर गेल्यानंतर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्याचे स्थान मिळू शकेल.
We can confirm that @JofraArcher will miss the second Test against India in Chennai starting on Saturday after having an injection in his right elbow.
— England Cricket (@englandcricket) February 11, 2021
