क्राईम न्यूज

पुण्यातील गुंडाची कारागृहातून मधून सुटल्यावर चक्क मिरवणूक !

गजाजन मारणे याची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक

पुणे: राज्यात दुसरा लॉकडाऊन होण्याच्या मार्गावर आहे तर पुण्यात चक्क एका गुंड सुटला म्हणून त्याची तळोजा कारागृहातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. शासनाचे जमावबंदी चे नियम या गुंडांनी धाब्यावर बसवले आहेत. एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार पुण्यात घडला असून गुंड गजानन मारणे याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. समर्थकांनी तब्बल ३०० वाहनांचा ताफा सोबत घेत ही मिरवणूक काढली. गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने त्याची ही जंगी मिरवणूक काढल्याचे समजते.

अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एका हत्येप्रकरणी गुंड गजानन मारणे याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या खुनातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाल्यावर तळोजा कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास ३०० हून अधिक चारचाकी वाहने तिथे होती. त्यानंतर कारागृह ते थेट पुण्यापर्यंत या गाड्या घेऊन घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.गजानन मारणे आणि त्याची टोळी हि माल मत्तेच्या व्यवहारावरून तसेच पैश्याच्या व्यवहारवरून त्यांच्या ‘ ऐरिया’ मध्ये गुन्हेगारी कृत्य करतात असे माहितीवरून कळते.

गजानन मारणे याच्या प्रतिस्पर्धी टोळीचा सदस्य पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे हत्येप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे उर्फ महाराज याला त्याच्या साथीदारांसह शुक्रवारी निर्दोष मुक्त केले. पोलिसांनी सांगितले की यापूर्वी मारणे आणि घायवळ टोळी यांच्यात बर्‍याच चकमकी झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button