आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी उद्या (१८ फेब्रुवारी रोजी) चेन्नईत लिलाव होणार आहे. या लिलावासाठी आठ संघ एकूण २९२ खेळाडूवर बोली लावतील. यापैकी १६४ खेळाडू भारतीय असतील. तर ३५ ऑस्ट्रेलियाचे, २० न्यूझीलंडचे, १९ वेस्ट इंडिजचे, १७ इंग्लंडचे, १४ दक्षिण आफ्रिकेचे, ९ श्रीलंकेचे, ७ अफगाणिस्तानचे आणि नेपाळ, युएई आणि युएसए या देशाचे प्रत्येकी १ खेळाडू आहेत.
यावेळी बीसीसीआय चेन्नईमध्ये आयपीएल 2021 लिलावाचे आयोजन करीत आहे. चेन्नईच्या आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये या खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे.
आयपीएल 2021 लिलाव गुरुवारी 18 फेब्रुवारी 2021 ला दुपारी 3 वाजता लिलाव सुरू होणार आहे. ही लिलाव प्रक्रिया तीन ते चार तासांपर्यंत होऊ शकते.
आयपीएल 2021 च्या लिलावात मागील मोसमप्रमाणे यावेळेसही 8 संघांचा समावेश असणार आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्जस इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्ज) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी सहभागी होणाऱ्या संघाची नावं आहेत.
या लिलावासाठी सर्वाधिक रक्कम ही पंजाबकडे आहे. पंजाबकडे 53 कोटी 20 लाख इतकी रक्कम आहे. तर कोलकाताकडे सर्वात कमी म्हणजेच 10 कोटी 75 लाख इतकी राशी आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलनुसार प्रत्येक फ्रँचायजीला किमान 75 टक्के रक्कम ही खर्च करणं बंधनकारक असणार आहे. असं न केल्यास संबंधित फ्रँचायजीकडील उर्वरित रक्कम ही जप्त केली जाईल.
आठ संघ आणि त्यांच्याकडे असलेली रक्कम
पंजाबकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम-53 कोटी 20 लाख
बंगळुरुकडे असलेली रक्कम 35 कोटी 90 लाख
राजस्थानकडील रक्कम- 34 कोटी 85 लाख
चेन्नईकडे असलेली एकूण रक्कम – 22 कोटी 90 लाख
गतविजेत्या मुंबईकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम राशी – 15 कोटी 35 लाख
उपविजेतेपद मिळवलेल्या दिल्लीकडे असलेली रक्कम – 12 कोटी 90 लाख
हैदराबादकडे लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम-10 कोटी 75 लाख
कोलकाताकडे लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 10 कोटी 75 लाख
