BJPPoliticsठाणेठाणे महानगरपालिका

ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या आर्थिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी सी. ए. विनोद लक्ष्मण टिकमानी यांची नियुक्ती

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहर जिल्हा भाजपाच्या आर्थिक प्रकोष्ठ अध्यक्षपदी सी. ए. विनोद लक्ष्मण टिकमानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक प्रकोष्ठमध्ये श्री. टिकमानी यांच्याबरोबरच पाच उपाध्यक्ष, १० सचिव आणि १५ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

 

भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या आर्थिक प्रकोष्ठ सेलच्या अध्यक्षपद नियुक्तीचे पत्र आमदार निरंजन डावखरे व संजय केळकर यांच्या हस्ते स्वीकारताना विनोद टिकमानी.

भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत सी. ए. विनोद टिकमानी यांनी पदाची सूत्रे स्विकारली. या वेळी माजी नगरसेवक लक्ष्मण टिकमानी, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विकी टिकमानी यांची उपस्थिती होती.

आर्थिक प्रकोष्ठच्या उपाध्यक्षपदी डॉ. तुषार पाटील, राजेश ठाकूर, सी. ए. परवेश कर्णा, सी. ए. प्रियांका अगरवाल, दिपेश तिवारी, सचिवपदी डॉ. धनंजय मोरे, पवन रामचंदानी, शब्बीर लोखंडवाला, सचदेव हरेश, सी. एस. किरण लक्ष्मण टिकमानी, अॅड. गीता लुंडवानी, सी. एस. स्नेहा गंगवानी, निकिता धर्माधिकारी, संजय घरत, रिचा बजाज यांची नियुक्ती करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्यपदी वीणा झुरानी, अखिलेश झा, हरमिंदर सिंग, किशोर थेरानी, सी. ए. मोईझ ठाणावाला, प्रतिक हरिया, मनोज म्हात्रे, राजकुमार गुप्ता, सुनिल सुखेजा, संजय लोचानी, अशोककुमार चांदवानी, राहूल बागूल, प्रकाश माखिजा, कमलेश सधवानी, करिश्मा गंगवानी, अंजली भक्तियानी, सी. एस. अंकित कारिया, संदिप बियानी, केशव जाखोटीया यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button