Corona UpdatesIndian RailwayMaharashtra GovRailwaysमुंबई

मुंबईकरांनो सावधान! लोकल्स मध्ये फिरत आहेत रेल्वेचे अधिकारी

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी एवढी सक्त ताकीद देऊन सुद्धा काही नागरिक हे विना मास्क फिरत आहेत. अगदी लोकल गाड्यांमध्ये सुद्धा मास्क काढून बिनधास्त बोलणे, खाणे आणि इतर गोष्टी चालू आहेत. आता कोरोना नाही अशा अविर्भावातच लोक वागत आहे. या लोकांना एक नवीन नाव पडलं आहे ते म्हणजे सुपरस्प्रेडर . कोरोना प्रादुर्भावित सुपरस्प्रेडरच चे काम करणाऱ्या विना मास्क प्रवाशांवर अतिशय कडक रित्या कारवाई करण्याचे काम हे रेल्वे शासन करत आहे. विना मास्क फिरणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांसाठी नियुक्त केलेले मार्शल आणि अन्य कर्मचारी साडेपाच हजाराहून अधिक कारवाई करत ११ लाखाहून जास्त अधिक रकमेची दंडवसुली केली आहे.

गेल्या काही दिवसात रोज ३०० हुन जास्त मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण पाहता, १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी च्या काळात एकूण ३,४९७ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. दंडाची एकूण रक्कम ही ८ लाखांच्या घरात पोहचली आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकानावर विना मास्क फिरणाऱ्यांकडून ३ लाख २१ हजाराचा दंड वसूल झाला असे माहितीनुसार कळते.

गर्दीचा फायदा घेऊन हे सुपरस्प्रेडर विना मास्क फिरतात. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानक या लोकांचे प्रमाण जास्त आहे. रेल्वेकडून वारंवार सूचना देऊन सुद्धा हे सुपरस्प्रेडर नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही पाऊले उचलल्याचे समजते. करोनाबधितांच्या संख्येतील वाढ अशीच कायम राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउनचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे. लॉकडाउन होणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू आहे. प्रवाशांच्या तुलनेत मार्शलची संख्या कमी आहे. यामुळे महापालिकेकडून रेल्वे स्थानकात अतिरिक्त मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button