केडीएमसीठाणे शहरलाईफस्टाईल

ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाची हजेरी

ठाण्यामध्ये आज सकाळी पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं आज रिमझिम का होईना पण हजेरी लावल्यामुळं हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाऊस चांगला झाला आहे. गणपतीमध्ये पाऊस गायब झाल्यामुळे गणेशभक्तांना गणेशोत्सव साजरा करणं काहीसं सुकर झालं. सकाळी साडेआठ पर्यंत ठाण्यामध्ये २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी आजपर्यंत ३ हजार १६० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा आत्तापर्यंत ३ हजार २३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button