
बाळ गोपाळ मित्र मंडळ मनोरमानगर,ठाणे यांच्या वतीने साजरा करण्यात येते असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये यंदा “पारंपरिक खेळाची जागा घेतली सोशल मीडियाने” हा देखावा साकारला आहे
बाळ गोपाळ मित्र मंडलाचा उत्सवाचे यंदाचे २१वे वर्ष आहे. दरवर्षी सामाजिक विषय घेऊन विविध देखावे मंडळाच्या वतीने साकारण्यात येतात यंदा मंडळाने लहानपणी मुले गोट्या,भौरे,लगोरी,लंगडी,खो खो,क्रिकेट,विटिदांडी आदी खेळ खेळत असे परंतु आता मुले सोशल मीडियामध्ये गुंतले गेले असल्याने या खेळांची जागा आता फेसबुक,ट्विटर,गूगल,व्हाट्सअप, गेम्स यांनी घेतली आहे यावर भाष्य करणारा देखावा साकारण्यात आला आहे. एक चांगला विषय घेऊन साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील तसेच शहरातील नागरिक गर्दी करत आहेत.
मंडळाची स्थापना सन १९९८ साली झाली.मंडळाचे प्रेरणास्थान धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या माध्यमातुन गणेशोत्सवाची सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या माध्यमातुन अनेक सांकृतिक,सामाजिक कार्यक्रम मंडळाच्या वतिने साजरे केले जातात.७ दिवस हा उत्सव चालतो.मंडळाच्या वतिने महा पुजेचे आयोजन केले जाते. तरी या उत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी असे आव्हान अध्यक्ष – योगेश औटी,उपाध्यक्ष – रुपेश चाळके,सचिव – रविंद्र बदिरके,खजिनदार – नितिन गायकवाड यांनी केले आहे


