Sportsठाणेठाणे महानगरपालिका

घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या वतीने `सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण’

ठाणे:  घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे व विलास सामंत मा. नगरसेवक शिवसेना ह्यांच्या विद्यमाने व पुढाकाराने `सीझन बॉल क्रिकेट प्रशिक्षण’ 8 ते 14 वयोगटातील मुले व मुलींसाठी घंटाळी मैदान, नौपाडा, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण महिन्यातील दर शनिवार व रविवार सकाळी 7 ते 9 या वेळेत माफक शुल्कात दिले जाईल. 

सदर प्रशिक्षणाचा शुभारंभ 19 फेब्रुवारी 2021 शिवजयंतीच्या शुभ दिनी क्रिकेटर सदानंद भिसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रिकेटर किशोर ओवळेकर, सुशील म्हापुस्कर, रणजीपटू संदीप दहाड, आयसीसी लेव्हल 1 प्रशिक्षक भरत शर्मा, खेळाडू, त्यांचे पालक व इतर मान्यवर उपस्थित होते. घंटाळी प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष विलास सामंत व विश्वस्त चैतन्य सामंत ह्यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला आणि गरजू व मध्यम वयोगटातील खेळाडूंना याचा लाभ मिळेल याची खात्री दिली.  

ह्या प्रशिक्षणाची धूरा राज्यस्तरीय क्रिकेटपटू सागर जोशी व कमलाकर कोळी यांच्याकडे असेल आणि रणजीपटू मयूर कद्रेकर हे या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी सागर जोशी (9022035397) व नम्रता ओवळेकर राणे (9920781700) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button