मुंबई
शिवसेना पक्षप्रमुखांचे आभार मानण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील शिवसेना भवनात
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरल्याबाबत महामुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील शिवसेना मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मोर्चाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण लढ्यात पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

‘कोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही हिरावून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. त्यामुळे आता कुणीही सुप्रीम कोर्टात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये. या वादात कुणीही रमू नये, या आरक्षणाच्या आड कुणी आलंच तर शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठी उभी राहील,’ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

