Election

राज्यसभेच्या ११ जागांसाठी ९ नोव्हेंबरला निवडणूक

राज्यसभेच्या ११ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. ९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल घोषित होणार आहे.

या ११ पैकी १० जागा उत्तर प्रदेशातील असून १ उत्तराखंड येथील आहे. या सदस्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपतो आहे. २७ ऑक्टोबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. २८ ला अर्जाची पडताळणी होईल व २ नोव्हेंबरपर्यंत नावं मागे घेता येतील. उत्तर प्रदेशातून सपाचे ४, भाजपाचे ३, बसपा २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. पक्षांच्या बळानुसार भाजपा ८ आणि सपा १ जागा जिंकू शकते. विरोधी सपा, बसपा आणि काँग्रेस सोबत आलेत तर ते दहावी जागा जिंकू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button