Maharashtra GovPoliticsनागपूरराजकारण

शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी, त्यांना शेतकऱ्यांविषयी प्रेम नाही!

 

नागपूर: शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची जहरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी काल (२० सप्टेंबर) गदारोळ घातला होता. देशाच्या संसदेत असे वर्तन या आधी कधी पाहीलं नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करत आहेत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करत असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

“नीती आयोगाने टास्क फोर्स तयार केला होता. त्याचा मी अध्यक्ष होतो. हे तिन्ही कायद्यांच्या शिफारसी त्या टास्क फोर्सने केल्यायत. कमलनाथ यांचे मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. कर्नाटकने देखील त्यावेळी तेच मत मांडल्याची आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यावेळी टास्क फोर्स तयार केला त्यांनी केलेल्या शिफारशींमध्ये या कायद्याचा समावेश होता. ज्या पंजाब राज्यात काँग्रेस या कायद्याविरोधात आंदोलन करत आहे, त्यांच्या जाहीरनाम्यातही या कायद्याच्या तरतुदी होत्या. टास्क फोर्समध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री कमलनाथ होते. कमलनाथ यांनी जे मार्गदर्शन केले ते याहीपेक्षा डायनामिक होतं. जगात जास्त भाव जेथे मिळेल, तेथे शेतकरी माल विकू शकेल. स्वामिनाथन आयोगात याच शिफारशी होत्या, त्या मोदींनी मान्य केल्या होत्या,” देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“कॉंग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो जाहीरनामा दिला होता, त्यातील सर्व कामे केंद्रातील मोदी सरकारने केली आहेत. कॉंग्रेस म्हणाली होती, बाजार खरेदी कायद्यात दुरुस्ती करणार. काल तेच केलं. याशिवाय कॉंग्रेस म्हणाली होती, शेतकऱ्यांना मुक्तपणे शेतमालाची विक्री करता यावी, अत्यावश्‍यक वस्तू कायदा रद्द केला, फक्त भूकंप किंवा युद्ध अशा अवस्थेत अत्यावश्‍यक वस्तू कायदा राहील, शरद पवार कृषिमंत्री असताना बाजार समिती कायद्यासंदर्भात त्यांनी जे आश्‍वासन दिलं होतं, ते कॉंग्रेसचही होतं मोदी सरकारने तेही पूर्ण केलं. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील सर्व गोष्टी मोदी सरकारने पूर्ण केल्या आणि काल जाहीर केल्या. त्यामुळे आता विरोध करण्याचे काही काम नाही. पण तरीही केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे”.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button