नाशिक

मंत्री जयकुमार रावल यांनी दिले दूध भेसळ प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश

नाशिक – वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या दूध भेसळ बाबतची दखल अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जयकुमार रावल यांनी प्रधान सचिव व आयुक्त यांना दिले. नाशिक येथील सिडको भागातील नागरिकांना दुधात प्लास्टिकसदृश पदार्थ असल्याचे आढळून आले असता त्यांनी ही बाब जवळील माध्यमांना सांगितली. दुधासारख्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित खाद्य पदार्थात भेसळ होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button