बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC
बालगृह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या 893 संस्थांना चार महिन्यांची मुदतवाढ
बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत बालगृह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केलेल्या 893 संस्थांची नोंदणीची मुदत संपलेली. मात्र या संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले. या संस्थेमध्ये 01 मार्च 2019 रोजी प्रवेशिका दाखल असल्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास आयुक्तालयास सादर केला त्यानुसार शासनाकडून अशा संस्थांना चार महिन्यांची प्रशासकीय मुदतवाढ देण्यात आली. सदरील माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयाने दिली .
