Maharashtra GovTravel
रिक्षाचालक-मालकांच्या कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंगळवारी रिक्षाचालक-मालकांच्या विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल. असे आश्वासन दिले आहे तसेच यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसात गठित करून त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज आणि रिक्षाचालक-मालकांसाठी राबवायच्या विविध योजनांची आखणी देखील केली जाईल असे देखील सांगितले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्यासह राज्यातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
